32.1 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ लोककला ही संस्कृती टिकविण्याचे माध्यम – संजय टेंभरे

लोककला ही संस्कृती टिकविण्याचे माध्यम – संजय टेंभरे

0
97

गोरेगाव,दि.24 – ग्रामीण भागात आजही लोककला अतिशय उत्कृष्ट रित्या सादर केली जाते. या लोककलेचा माध्यमातून ग्रामीण जीवनातील संस्कृती अधोरेखित केली जाते. लोककला ही संस्कृती टिकविण्याचे माध्यम आहे, असे प्रतिपादन बळीराजा पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय टेंभरे यांनी केले. तालुक्यातील सटवा येथे शाकुंतल नाट्य मंडळ सटवाच्या वतीने हियान भागचंद रहांगडाले यांच्या भार कार्यक्रम निमित्ताने नवटंकी ड्रामाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सभापती मोरेश्वर कटरे यांच्या हस्ते जिल्हा भाजप उपाध्यक्ष रेखलाल टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष केवलराम बघेले, ओबीसी जिल्हा कॉन्ग्रेस अध्यक्ष जितेंद्र कटरे, भाजप कार्यकर्ते योगेश चौधरी, सुरेश टेंभरे, सरपंच विनोद पारधी, माजी सरपंच रमेश ठाकूर, कुवरलाल रहांगडाले, पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष इंद्रराज ठाकूर, फुलचूर पोवार संघटनेचे पप्पू पटले, फुलचूर ग्राम पंचायत सदस्य देवचंद बिसेन, अभियंता फिरोज बिसेन, डॉ. के.टी. कटरे, सहायक शिक्षक डी. के. रहांगडाले, देवकांत ठाकूर, कमलाबाई बिसेन, जगदीश बोपचे, शाकुंतल नाट्य मंडळ अध्यक्ष नानाजी रहांगडाले आदी उपस्थित होते. सुरुवातीला बजरंग बली यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जितेंद्र कटरे, सुरेश टेंभरे, केवलराम बघेले, मोरेश्वर कटरे, रेखलाल टेंभरे यांनी मार्गदर्शन करून ग्रामीण भागात आजही लोककला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण कलाकार हे जीवाचा आटापिटा करीत असल्याचे अधोरेखित केले. ग्रामीण भागात लोककला हे समाज जागृतीचे माध्यम असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन नितीन कटरे यांनी तर आभार प्रदर्शन भागचंद्र रहांगडाले यांनी केले.