अहमदाबाद (वृत्तसंस्था),दि. २४- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सोमवारी दोन दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी अहमदाबादेत दाखल झाले. रोड शो आणि साबरमती आश्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प मोटेरा स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. यावेळी स्वागत भाषणामध्ये मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमधील विविधता एक मजबूत संबंधांचा आधार आहे. एका देशाकडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तर दुसऱ्याकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. या कार्यक्रमासाठी 1.25 लाख उपस्थित आहेत. अमेरिकेहून 1000 एनआरआय सुद्धा या समारोहात सहभागी झाले आहेत. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.ट्रम्प हे गेल्या 61 वर्षात भारत दौर्यावर येणारे 7 वे अध्यक्ष आहेत. बराक ओबामा दोन वेळेस भारत दौऱ्यावर आले होते.
मुलासोबत आई आणि कॉन्स्टेबलची ड्यूटी निभावत आहे महिला पोलिस कर्मचारी
गुजरातच्या वडोदरा शहराच्या गोरवा पोलीस स्टेशनमध्ये असलेली पोलिस कर्मचारी एकाचवेळी कॉन्स्टेबल आणि आई होण्याची दुहेरी जबाबदारी सांभाळत आहे. वडोदराच्या महिला कॉन्स्टेबल संगीता परमार यांना सध्या अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी तैनात केले गेले आहे. त्यांचा मुलगा केवळ एका वर्षाचा आहे. संगीताने सांगितले, ड्यूटीदरम्यान मुलगा त्रास देतो. अनेकदा फीडिंग करताना मलाही त्रास होतो. मी मी माझ्या जाबदाऱ्या पार पडण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.
संगीता परमारला 19 फेब्रुवारीला आदेश मिळाला होता की, त्यांना ट्रम्प यांच्या कार्यक्रमात बंदोबस्तासाठी अहमदाबाद जायचे आहे. आदेश मिळाल्यावर संगीताने पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांकडून एका वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांना इंफेक्शन झाल्याचे सांगितले. पण नंतर जबाबदारी लक्षात घेऊन त्या मुलाला घेऊन त्याच रात्री अहमदाबादला पोहोचल्या. येथे संगीता यांना रायचंद नगर रोडवर तैनात केले गेले आहे. येथेच त्यांनी मुलासाठी झाडाला कपड्याचा झोका बांधला आहे. ड्यूटीसोबतच त्या मुलाकडेही लक्ष देत आहेत. ट्रम्प यांच्या कार्यक्रमासाठी वडोदराहून 500 जवान बोलावले गेले आहे.





