35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान- शिवसेनेची मोदींवर टीका

महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान- शिवसेनेची मोदींवर टीका

0
21

blank

मुंबई- महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अब्ज डॉलर्सची मदत जाहीर करून भारताच्या आर्थिक ताकदीची चुणूक दाखविली आहे. हीच सढळता आमच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या बाबतीत दाखवली व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरेच होईल, अशी टीका शिवसेनेने ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मंगोलिया देशाच्या दौ-यावर होते. यादरम्यान मोदींनी मंगोलियाला 1 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. या मुद्यांवरून शिवसेनेने मोदी व भाजपला लक्ष्य केले आहे. मंगोलियाला मदत करण्याबरोबरच महाराष्ट्रातील शेतक-यांनाही मदत करणे गरजेचे असल्याचे सांगत भाजपच्या दोन्ही सरकारला लक्ष्य केले आहे.

blank