पंतप्रधान मोदी भारतात परतले, ट्विटरवर टीकेचा मारा सुरूच

0
17

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्यरात्री चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया असा सहा दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परतले. मोदींच्या तीन देशांच्या दौऱ्याला 14 मे रोजी चीनपासून सुरवात झाली होती. या दौऱ्यात ते शिआन, बिजींग आणि शांघाय या शहरांना भेट दिली. तसेच चीनमधील प्रमुख नेत्यांच्या भेटीही घेतल्या. मोदींच्या या दौऱ्यामध्ये तिन्हीही देशांसोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करार करण्यात आले. यामुळे देशातील गुंतवणूक तर वाढेलच, पण त्याचबरोबर चीनलगतच्या सीमाभागामध्ये शांतता निर्माण होईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.
भारताच्या मेक इन इंडिया प्रकल्पाच्या प्रमोशनबरोबरच मोदी यांनी या तिन्ही देशांतील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. याचा मोठा फायदा आर्थिक प्रगतीस होईल, असे ‘पीएमओ‘ने म्हटले आहे.
पंतप्रधानानी शांघायमध्ये केलेल्या टिप्पणीवरून चौफेर टीका अद्यापही सुरु आहे. सोशल मीडियावरही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या मोदी इन्सल्ट्स इंडिया हा हॅशटॅग काल पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता.देशाची एवढी दुर्दशा झाली होती की, आपला भारतात जन्म झाला याची लाज, भारतीयांना वाटत होती असं मोदींनी म्हटले होते. शांघायमध्ये भारतीय समुदायासमोर ते बोलत होते. मोदींची भाषणे चांगली असली तरी त्यांनी विदेशात असे बोलणे टाळले पाहिजे असे नेटीझन्सचे म्हणणे आहे.