
भंडारा,दि.26-गेल्या 2013 मध्ये जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लागून असलेल्या मुंडीपारनजीक केंद्रसरकारचा भेलप्रकल्पाची सुरवात करण्यात आली.तत्कालीन केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती.परंतु लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्या प्रकल्पाच्या कामकाजाला ब्रेक लागल्याने प्रकल्प होईल की नाही अशीच परिस्थिती निमार्ण झाली होती.ही परिस्थिती निर्माण होताच अजय तुमसरे यांनी भेल बचाव संघर्ष समिती तयार करुन लढा देण्यास सुरवात केली.केंद्रीय उद्योगमंत्री ना.अनंत गिते हे नागपूर भेटीवर आज आले असता त्यांना रवीभवन येथे जाऊन प्रकल्पासंबधी माहिती देऊन हजारो बेरोजगारांच्या समस्येची माहिती दिली.ते्व्हा तुमसरे यांच्या शिष्टमंडळाला ना.गिते यांनी प्रकल्पाचे काम लवकरच गतीने सुरवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी भेल बचाव संघर्ष परीषदेचे अध्यक्ष डाॅ. अजयराव तुमसरे आणी पदाधिकारी नरेशजी करंजेकर , रतनजी झिंगरे उपस्थित होते.





