7 मार्च रोजी मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याचे आयोजन

0
219

गडचिरोली,दि.05:- महाराष्ट्र शासन व शांतीलाल फाऊंडेशन यांचे सयुक्त विद्यमाने जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळामध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम जानेवारी 2016 पासून टप्याटप्याने सुरु करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये या कार्यक्रमाच्या अंतर्गत होत असलेले परिवर्तन सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा स्तरावर मूल्यवर्धन मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक 7 मार्च 2020 या कालावधित जिल्हा परिषद हॉयस्कुल, गडचिरोली चे सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील न्याय,स्वातंत्र्य, समानता व बधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता 1 ली पासून रुजविणे. तसेच बालस्नेही व विद्यार्थीकेंद्रीत पध्दतीने आनंददायी वातावरणामध्ये सहयोगी अध्ययन व ज्ञानरचनावादावर आधारीत शिक्षण पध्दतीचा वापर करुन, विविध कृती, वर्ग उपक्रम आणि शालेय उपक्रम याद्वारे सातत्याने आणि सुनियोजित रितीने संधी उपलब्ध करुन देणे ही मुल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना आहे.