37.6 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ मी वाऱ्यावर सोडणारा नेता नसून काम तडीस नेणारा-आमदार कपिल पाटील

मी वाऱ्यावर सोडणारा नेता नसून काम तडीस नेणारा-आमदार कपिल पाटील

0
283

गोंदिया,दि.05ः-महाराष्ट्रातील शिक्षण विभागात SSA कर्मचाऱ्यांची भूमिका किती महत्वाची आहे.हे मी शिक्षक आमदार म्हणून जाणून आहे.कंत्राटी,शिक्षण सेवक हे शब्द म्हणजे शिक्षण विभागाला लागलेली कीड असून ते मी काढून फेकण्यासाठी नेहमी तयार असल्याचे विचार आमदार कपील पाटील यांनी व्यक्त केले.ते समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी म.रा.भंडारा-गोंदियाच्या वतीने आयोजित केलेल्या शैक्षणिक अधिवेशनात आमदार कपिल पाटील उपस्थित राहू शकले नव्हते.त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातर्फे वशिष्ठ खोब्रागडे यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन संघटनेची भूमिका मांडली.त्यावर मी वाऱ्यावर सोडणारा नेता नसून काम तडीस नेणारा आहे असे उद्गार काढून आपले सत्कार स्विकारतो असे म्हणाले.आपल्या आंदोलनात शिक्षक भारती राज्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत कार्यरत आहेत त्यांना भेटा, त्यांचेशी संपर्कात राहा त्यांना सोबत घ्या, हेच माझे मुख्य कार्यकर्ते आहेत.त्यांनी शब्द दिला म्हणजे मी शब्द दिला असे समजावे असेही पाटील म्हणाले. शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी शिक्षक भारती परिवार तर्फे महान विभूती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व गाडगे महाराज यांचे दुर्मिळ छायाचित्र भेट दिले.सत्काराच्या वेळी वशिष्ठ खोब्रागडे,नवनाथ गेन्ड,भरत शेलार,दिनेश खोसे,कदम,देशमुख,नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, गोंदिया व सर्व जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती परिवाराचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.