भंडारा,दि.7:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भंडारा नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व महिला व बाल कल्याण समिती शहर समृध्दी उत्सव अंतर्गत 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मिस्कीन ट्रक गार्डन, भंडारा येथे आयोजित महिला मेळावा आयोजन करयात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये आधार शहर उपजिविका केंद्राचे उदघाटन, महिला बचत गटांमार्फत उत्पादित वस्तुंची प्रदर्शनी-विक्री, क्रीडा व सामाजिक तसेच उद्योजक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार, 10 वी व 12 वी मध्ये प्रथम,द्वितीय आलेल्या विद्यार्थीनीचा सत्कार, असांसर्गिक रोग निदानाकरीता महिलांचे नि:शुल्क रक्तचाचणी, तपासण्यांचे रिपोर्ट वितरण, स्त्री शक्तीचा गजर व जागर, सांस्कृतिक व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अदिशक्तीचे रुप असलेल्या स्त्रीयांमध्ये सर्व विश्व सामावले आहे. स्त्रीयांमुळेच विश्वाची निर्मिती झाली आहे. अशा या स्त्रीत्वाचा गौरव व्हावा यासाठी महिला मेळावा कार्यक्रमामध्ये महिलांसाठी नाटिका, नृत्य आणि कायदे, आरोग्य, आहार, बेटी बचाओ, बेटी पढाओ व्याख्यान व जनजागृती व विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर परिषद तर्फे करण्यात आले आहे.





