आमगाव(पराग कटरे)दि.09ः- आजच्या युगात पुण्यतिथी कार्यक्रमावरती हजारो रुपये खर्च केला जातो.पण जवळच असलेल्या तालुक्यातील रामपुर/पानगांव येथील निवासी सेवानिवृत् प्राचार्य कमलबापू बहेकार यांनी आपल्या आई मीराबाई बहेकार यांच्या प्रथम पुण्यतिथी कार्यक्रमात वायफळ खर्चाला फाटा देत. दिव्यांग, आणि वयोवृद्ध नागरिकाना गृह उपयोगी साहित्य वाटप करून पुण्यतिथी कार्यक्रम साजरा केला.
श्रीमंत असो व गरीब पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पाहुणे,मित्र मंडळींना बोलावून विधी, मंडप, भजन, कीर्तन, जेवण, खर्च करणे आदी परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहेत. शिवाय वाढती महागाई तरी देखील समाजात अशा प्रवृत्तींना ऊत आला असून सर्व काही असतांना देखील समाजासाठी आपण काही देणं लागते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत गरजु लोकांना साहित्य वाटप करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्त (दि.7)रामपुर येथील परमात्मा एक सेवक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यतिथी समारंभ व भेट वस्तु वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी जितेंद्र मेंढे होते. यावेळी भास्करभाऊ मेंढे, रिद्धिरामभाऊ मेंढे, रघुनाथजी दोनोडे, चंद्रकुमार मेंढे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, अनंतराम कोरे, जनाबाई तावडे, रमेशभाउ बहेकार, प्रा.कमलबापू बहेकार प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी ग्राम पंचायत पानगांव परिसरातील दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना आमंत्रित करून भेट वस्तु वितरित करण्यात आले. कमलबापू बहेकार यांनी प्रस्ताविक मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन सरपंच नामदेव दोनोडे यानी तर उपस्थिताचे आभार प्रदीप बहेकार यांनी मानले. यावेळी समस्त कुटुबिय व गावकरी नागरिक मोठ्या संखेत उपस्थित होते.





