गोंदिया दि. 9:-: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पुर्व परीक्षा 15 एप्रिल रोजी दोन सत्रात सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत गोंदिया येथील एस.एस.गर्ल्स कॉलेज विठ्ठलनगर, श्री महावीर मारवाडी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज विठ्ठलनगर, गोंदिया पब्लिक स्कूल डी.बी.एम.सदन विद्या विहार पांगोली नदी रोड गोंदिया खुर्द, बी.एन.आदर्श सिंधी विद्यामंदिर हायस्कूल मुर्री रोड, गुजराती नॅशनल हायस्कूल रेलटोली, राजस्थान कन्या विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् कुष्णपुरा वार्ड मोटवाणी चेंबर जवळ, गोंदिया या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उदा. कॅलक्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन आदींचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या परीक्षा प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ची कलम 144 चे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. हे आदेश 5 एप्रिल 2020 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.




