38.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home राजकीय तालुका काँग्रेस अध्यक्षपदी संजय बहेकार

तालुका काँग्रेस अध्यक्षपदी संजय बहेकार

0
213

आमगाव,दि.10ः- विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक तालुका काँग्रेस अध्यक्ष व महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा शहर अध्यक्ष पद रिक्त होते.आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील आमदार सहषराम कोरोटे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ना. बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी आमगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष पदावर संजय बहेकार व महिला तालुका अध्यक्ष म्हणून छबुताई उके आणि शहर अध्यक्ष म्हणून अजय खेतांन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तिन्ही अध्यक्ष ना जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती पत्र देण्यात आले.त्यांच्या या नियुक्ती प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सचिव रामसिंग चौहान तालुका काँग्रेस महासचिव इसुलाल भालेकर, जि. प. सदस्य उषाताई मेंढे, माजी तालूका काँग्रेस अध्यक्ष राजकुमार फुंडे, शंभूदयाल अग्रीका, प.स सदस्य लोकेश अग्रवाल, महेश उके, उषाताई भांडारकर, ममता पाऊलझगडे, प्रभाताई उपराडे, दीपक शर्मा, बाबू मेंढे रविदत्त अग्रवाल, राधकीसन चुटे, संतोष दुबे, अरविंद चुटे, दिवाकर चुटे, बंडू महारवाडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जगदीश चुटे यांनी केले