गोंदिया,दि.10 : राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी रोजी गोंदिया व भंडारा या दोन जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्याच्या सार्वजनिक निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना, आरक्षण सोडतसह निवडणूक विभागाच्या कामाकाजाचा कार्यक्रम जाहीर केला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय कामाला लागला आहे. मात्र निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज कार्यालयाच्या ४ इमारतीपुरतेच ठरले आहे. कार्यक्रमानुसार (दि.९) आरक्षण सोडतीची सुचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करायची होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडून सुचना प्रकाशित कुठे करण्यात आली, याची साधी माहिती मिळत नसल्याने निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय पुरताच असल्याची प्रतिक्रिया राजकारण्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी ज्यांच्याकडे हा विभाग येतो,त्यांनाही याची प्रसिध्दी व प्रसार वृत्तपत्राच्या माध्यमातून व्हावे असे न वाटल्यानेच चक्क या प्रकियेकडेच कानाडोळा त्यांनी केल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे यापुर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील घोट्याळ्याच्या चौकशीवर कारवाई करण्याएैवजी ती चौकशीच दाबून ठेवण्याचे कामही जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्याने या कार्यालयातील प्रमुखांच्या कार्यक्षमेतवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा पंचवार्षी कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपणार आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकाकरिता निवडणूक विभाग कामाला लागला आहे. १४ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक संदर्भातील प्रभाग रचना, आरक्षण सोडत व इतर कामकामांचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच सुचनाही जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय कामाला लागले आहे. गट व गण रचना, गट व गणातील लोकसंख्या आदी कामे जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांना निवडणूक कार्यक्रमानुरूप जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाकडे डोहाळे लागले आहेत. गट व गणाची रचना, लोकसंख्या आदी बाबींची माहिती घेण्यासाठी राजकारणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिरक्या मारत आहेत. ऐवढेत नव्हेतर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाचे पायपीट करीत आहेत. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कसलेही माहिती देण्यात सोयीस्कर टाळले जात आहे. ऐवढेत नव्हेतर कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीचे कामकाज होत नसल्याचेही अनुभूती येऊ लागली आहे. कार्यक्रमाप्रमाणे ९ मार्च रोजी आरक्षण सोडतीची सुचना प्रसिद्ध करायची होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुचना कोणत्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आली हे कळेनासे झाले आहे.
त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयकडून निवडणूक कार्यक्रमानुसार कामकाजाची माहिती देण्यासही सोयीस्कर टाळले जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कार्यक्रम फक्त यंत्रणेपुरतेच आहे काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
प्रसिद्धीची माहिती देण्यास सोयीस्कर टाळले
कार्यक्रनुसार आज (ता.९) आरक्षण सोडतीची सुचना प्रसिद्ध करण्यात आली काय? या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती बेलपत्रे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले. दरम्यान सुचना प्रसिद्ध करण्यात आली, माहिती देण्यात आली. परंतु प्रसिद्धीच्या माध्यमाबद्दल विचारपूस केली असता त्यांनी सोयीस्कर टाळले.
आयोगानुसार कार्यक्रम
९ मार्च – आरक्षण सोडतीची सुचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे.
१३ मार्च – आरक्षणाची सोडत काढणे.
१६ मार्च – प्रारुप प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिद्ध करणे
१६ ते २३ मार्च- हरकती व सुचना तसेच सुनावणी
३० मार्च – गण रचना अंतिम करणे (विभागीय आयुक्त)
३ एप्रिलपर्यंत – अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धी (जिल्हाधिकारी)





