गडचिरोली,दि.11: धुलीवंदनाचा दिवस जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र,
गडचिरोली शहरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळाच उपक्रम राबविला. मित्रांना रंग लावून धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतानाच या कार्यकर्त्यानी नागरिकांच्या भिंतीवर पत्रके चिपकवून जनगणनेत ओबीसी समाज सहभागी होणार नाही, असे संकेत दिले. या उपक्रमाला शहरातील ओबीसी बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला . २०२१ च्या जनगणनेत ओबीसीचा रकाना नाही. त्यामुळे आमचा जनगणनेत सहभाग नाही, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, दादाजी चाफले, प्रा.देवानंद कामडी, दादा चुधरी, इंजि. सुरेश लडके यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, ओबीसी महिलाही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.





