अर्जुनी-मोर,दि.11: जागतिक महिला दिना निमित्त भव्य स्त्री आरोग्य तपासणी व कर्करोग निदान उपचार शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते डॉ.भारत लाडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गा चौक येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 721 महिलांनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये 335 महिला रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली व 129 रुग्णांना सोनोग्राफीची सेवा देण्यात आली. तपासणीदरम्यान 39 संशयित कर्करोग रुग्ण आढळले. 22 रुग्णांना मामोग्राफी, पाप स्मियर तपासणी साठी HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथे संदर्भित करण्यात आले. तर 13 रुग्णांना शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आलीअसून त्यांच्या तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना संदर्भित करण्यात येणार आहे. शिबिरांमध्ये प्रामुख्याने स्त्री रोगतज्ञ डॉक्टर प्रशांत झोळे, डॉ. रोशन राऊत, शल्यचिकित्सक डॉ. दत्ता ठाकरे, कॅन्सर तज्ञ डॉ. अनुश्री राऊत, डॉ. टीना मानमोडे, व जनरल फिजिशियन डॉ. देवेंद्र घरकर, डॉ. प्रणाली टेकाम, डॉ. दिनेश बारसागडे, डॉ. ए एम. कुकडे, डॉ. सुनिता कापगते, यांनी शिबिरामध्ये सेवा प्रदान केली. शिबिरामध्ये प्रामुख्याने आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी आपली उपस्थिती दर्शविली.तिथे आलेल्या महिला रुग्णांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवर महिला मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. याप्रसंगी आलेल्या महिला रुग्णांसाठी चहा व अल्पोपहाराची सोय पुरुष संघटना तर्फे करण्यात आली होती. त्याचप्रमाणे शिबिरामध्ये महिला विशेष करिता सेल्फी पॉइंट ची सुविधा करण्यात आली होती जी अत्याधिक आकर्षणाचे केंद्र ठरली. या शिबिराच्या आयोजनासाठी नगरातील सामाजिक संघटन राजे ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अर्जुनी चा राजा गणेश उत्सव मंडळ, शिवसेना- युवासेना तालुका अर्जुनी-मोर ,गुड मॉर्निंग सामाजिक संघटना, एकता मंच, तालुका माहेश्वरी संघटना, सिंधी सेवा समिती, कुणबी समाज संघटना, बौद्ध समाज संघटना, कोहळी समाज संघटना, राजपूत क्षत्रिय समाज संघटना, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ मंडळ सेवा समिती, तालुका वैद्यकीय संघटना, गोंदिया डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, अशा कल्प हेल्थकेअर, व समस्त पुरुष मंडळी अर्जुनी मोरगाव यांनी शिबिराच्या आयोजनाकरिता परिश्रम केले त्याच प्रमाणे एस. एस. जे. महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी यांनी शिबिरामध्ये सुव्यवस्थे करिता विशेष सहकार्य केले.





