ब्रम्हपुरी (चंद्रपूर ),दि.11 : ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा (पिंपळगाव) येथे नदीत बुडुन इसमाचा मृत्यु झाल्याची घटना दि. १० ला दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. मृतक इसमाच नाव कैलाश यादव ढोरे वय ३० वर्षे असून रा.कुरुड ता.देसाईगंज (वडसा) जि. गडचिरोली येथील रहिवासी आहे. मृतक इसम कैलासची सासुरवाडी खरकाडा येथील असून खरकाडा येथे पत्नीसह आलेला होता.सासुरवाडीत मुक्काम करुन दुसर्या दिवशी स्वगावी कुरुडला जाण्याकरीता निघाला असता जवळचा रस्ता म्हणून वैनगंगा नदीपात्रातून जाण्याचा प्रयत्न केला.त्यातच नदीतील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याचे कैलासला कळले नाही.अंगातील कपडे काढून कपडे भिजू नये म्हणून कपडे डोक्यावर ठेवला तसेच मोबाईल तोंडात पकडून नदी प्रवाहातून नदीच्या पलीकडे जाण्यास निघाला असतानाच तोल जाऊन पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.




