गोंदिया,दि.13ः:~ जिल्हा परिषदेच्या ५३ गटासाठी झालेल्या आरक्षण सोडतीत ३० जागा आरक्षित करण्यात आल्या.त्यामध्ये अनुसूचिज जातीकरिता ६ जागापैकी ३ जागा महिलाकरीता,अनुसूचित जमातीच्या १० जागासाठी 5 जागा महिलासाठी,नागरिकांचा मागासप्रवर्ग(ओबीसी)करीता १४ जागापैकी 7 जागा महिलाकरीता तर खुल्या गटातील 23 जागापैकी 12 जागा महिलांकरीता आरक्षित करुन सोडतीद्वारे काढण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डाॅ.कादंबरी बलकवडे,प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी व निवडणुक अधिकारी श्रीमती बेलपात्रे यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.या आरक्षण सोडतीत गोंदिया तालु्क्यात सर्वाधिक अनु.जमाती व जातीचे आरक्षण आले सोबतच महिलांचे आरक्षण आल्याने राजकिय धुरंधरांचे स्वप्न धुळीस मिळाले.तर राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर,कुंदन कटारे यांचे मतदारसंघ आरक्षीत झाल्याने त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली.पी.जी.कटरे,राजलक्ष्मी तुरकर,हामीद अल्ताफ यांना मात्र परत संधी मिळाली आहे.
अनु जाती(6 गट 3 महिला राखीव)
5- पांढराबोडी (महिला)
10- पिंडकेपार (महिला)
43- गोटाबोडी (महिला)
27- कु-हाडी
45- ककोडी
47- गोठणगांव।
अनु जमाती एकूण 10 जागा पैकी 5 महिला राखिव
2- पांजरा (महिला)
3- काटी
4- धापेवाडा
6- कामठा
11- कुडवा
13- खमारी (महिला)
18- ठाणा
26- घोटी (महिला)
35- सरांडी (महिला)
39- सौंदड (महिला)
नामाप्र(ओबीसी) एकूण 14 जागा पैकी 7 महिला राखिव
7- नागरा
15- घाटटेभणी (महिला)
16- किकरीपार (महिला)
17- गोरठा (महिला)
22- तिरखेडी (महिला)
31- सेजगाव
33- ठाणैगाव (महिला)
34- कवलेवाडा
37- पांढरी
49- बोंडगांवदेवी (महिला)
50- माहूरकुडा
51- इटखेडा
52- महागांव (महिला)
53- केशोरी
सर्वसाधारण एकूण जागा 23 पैकी 12 महिला👇🏻
01- बिरसोला (महिला)
08- रतनारा
09- एकोडी (महिला)
12- आसोली
14- फूलचूर
19- अंजोरा (महिला)
20- झालीया (महिला)
21- पिपरीया (महिला)
23- कारूटोला (महिला)
24- शहारवानी
25- सोनी
28- मुंडीपार (महिला)
29- निंबा
30- अर्जुनी
32- सुकडी (महिला)
36- वडेगाव (महिला)
38- डव़्वा (महिला)
40- चिखली (महिला)
41- शेंडा
42- पुराडा
44- भर्रेगाव
46- चिचगड
48- नवेगावबांध (महिला)




