गोरेगांव,दि.13ःःअवकाळी पाऊसासह वादळ आल्यामुळे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामालीला फटका बसला असून इमारतीवर छत उडाले तर टिनांचेही नुकसान झाले आहे.12 मार्चला सांयकाळी 7च्या सुमारास आलेल्या चक्रीवादळाचा फटका स्वयंपाक गृह,प्रसाधन गृह,वर्ग खोल्यांना बसला.आज सकाळी अवलोकन करून,शाळाप्रशासनाच्या वतिने सुमारे 1लक्ष रूपयाची नुकसान झाले असल्याचे घोषित करण्यात आले.
या आर्थिक नुकसानीची भरपाई शासन प्रशासनानी करावी.अशी मागणी सम्बंधिताना करण्यात येईल असे शाळा प्रशासनानी कळविले आहे.




