33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत जाहिर

पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत जाहिर

0
203

गोंदिया,दि.14 : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी पंचायत समिती गण निहाय आरक्षण सोडत आज तालुका निहाय काढण्यात आली. गोंदिया पंचायत समितीसाठी एकूण 28 जागा असून यामध्ये 14 जागा महिलांसाठी आरक्षीत करण्यात आल्या आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा असून त्यापैकी 6 जागा महिलांसाठी आरक्षीत, अनुसूचित जातीसाठी 3 जागा असून 2 जागा महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा असून 2 जागा महिलांसाठी आरक्षीत आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 8 जागा असून 4 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे.

तिरोडा पंचायत समितीसाठी एकूण 14 जागा असून 7 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 7 जागा असून 3 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आरक्षीत असून 1 जागा महिलेसाठी, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा असून ती जागा महिलेसाठी आरक्षीत आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 जागा असून 2 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे.

गोरेगाव पंचायत समितीसाठी एकूण 12 जागा असून 6 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 6 जागा असून यामध्ये 2 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. अनुसूचित जातीसाठी 1 जागा असून ती महिलेसाठी आरक्षीत आहे. अनुसूचित जमातीकरीता 2 जागा असून त्यापैकी 1 जागा महिलेसाठी आरक्षीत आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता 3 जागा असून त्यापैकी 2 जागा महिलेसाठी आरक्षीत आहे.

आमगाव पंचायत समितीमध्ये एकूण 10 जागा असून 5 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 5 जागा असून त्यापैकी 3 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. अनुसूचित जातीकरीता 1 जागा, अनुसूचित जमातीकरीता 1 जागा आणि नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता 3 जागा असून त्यापैकी 2 जागा महिलांसाठी राखीव आहे.

  सालेकसा पंचायत समितीमध्ये 8 जागा असून त्यापैकी 4 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. यामध्ये सर्वसाधारणसाठी 3 जागा असून 1 जागा म‍हिलेसाठी आरक्षीत आहे. अनुसूचित जातीकरीता 1 जागा असून ती महिलेकरीता आरक्षीत आहे. अनुसूचित जमातीकरीता 2 जागा आरक्षीत असून 1 जागा महिलेसाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता 2 जागा असून त्यापैकी 1 जागा महिलेसाठी आरक्षीत आहे.

सडक/अर्जुनी पंचायत समितीमध्ये 10 जागा असून यामध्ये महिलांसाठी 5 जागा राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 4 जागा असून महिलेसाठी 1 जागा आरक्षीत आहे. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आरक्षीत असून ती महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीकरिता 2 जागा असून त्यापैकी 1 जागा महिलेसाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता 3 जागा असून त्यापैकी 2 जागा महिलांसाठी राखीव आहे.

अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीमध्ये एकूण 14 जागा असून त्यामध्ये 7 जागा महिलांसाठी आरक्षीत करण्यात आल्या आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 5 जागा असून त्यापैकी 2 जागा महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जातीसाठी 2 जागा असून त्यापैकी 1 जागा महिलासाठी आरक्षीत आहे. अनुसूचित जमातीसाठी 3 जागा असून त्यापैकी 2 जागा महिलांसाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 जागा असून महिलांसाठी 2 जागा आरक्षीत आहे.

  देवरी पंचायत समितीमध्ये एकूण 10 जागा असून यापैकी 5 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1 जागा, अनुसूचित जातीसाठी 1 जागा असून ही जागा महिलेसाठी आरक्षीत आहे. अनुसूचित जमातीकरीता 5 जागा असून त्यापैकी 3 जागा महिलांसाठी आरक्षीत आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 3 जागा असून त्यापैकी 1 जागा महिलेसाठी आरक्षीत करण्यात आली आहे.

गोरेगाव, सालेकसा, सडक/अर्जुनी व देवरी या चार पंचायत समितीमध्ये मागील निवडणूकीप्रमाणेच यावेळीही अनुसूचित जातीसाठी एकच जागा आरक्षीत होत असून यापुर्वीच्या निवडणूकीमध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षीत होते त्यामुळे ही जागा आता महिलासाठी आरक्षीत राहणार आहे. आमगाव पंचायत समितीमध्ये मागील निवडणूकीप्रमाणे यावेळीही अनुसूचित जातीसाठी एकच जागा आरक्षीत होत असून यापुर्वीच्या निवडणूकीमध्ये अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षीत होते. त्यामुळे आता सदर जागा अनुसूचित जातीकरीता आरक्षीत राहील. तिरोडा पंचायत समितीमध्ये मागील निवडणूकीप्रमाणेच यावेळीही अनुसूचित जमातीसाठी एकच जागा आरक्षीत होत असून यापुर्वीच्या निवडणूकीमध्ये अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षीत होते. त्यामुळे आता सदर जागा अनुसूचित जमाती (महिला) करीता आरक्षीत राहणार आहे. आमगाव पंचायत समितीमध्ये मागील निवडणूकीप्रमाणेच यावेळीही एकच जागा आरक्षीत होत असून यापुर्वीच्या निवडणूकीमध्ये अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षण होते, त्यामुळे आता सदर जागा अनुसूचित जमातीकरीता आरक्षीत राहणार आहे.