32.7 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home विदर्भ पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद

पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना

0
101
file photo

वाशिम, दि. १९ : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षिततेच उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व ग्रामीण क्षेत्रातील मद्यविक्री १९ मार्च २०२०  पासून ते पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग नियंत्रण अधिनियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावास किंवा प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व ग्रामीण क्षेत्रातील सर्व बार व रेस्टॉरंट, सीएल-३ अनुज्ञप्ती (देशी दारू किरकोळ विक्री), एफ.एल. २  अनुज्ञप्ती (विदेशी दारू), एफ.एल.२ (बार), एफ. एल. ४ (क्लब) अनुज्ञप्ती १९ मार्च ते पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.