26.4 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home विदर्भ ७४० व्यक्तींचे वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण;‘कोरोना’चा एकही रुग्ण नाही

७४० व्यक्तींचे वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण;‘कोरोना’चा एकही रुग्ण नाही

0
354

गोंदिया, दि.२६: जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत १२९ जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. तसेच या व्यक्तींच्या संपर्कात आलेले ६१३ व्यक्ती आढळून आल्या आहेत. असे एकूण ७४२ व्यक्ती आहेत.त्यापैकी एकूण ७४० व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ५ व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत असून कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळलेली नाहीत.दोन प्रवाशांना शासकीय अलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी दिली.