25.9 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home विदर्भ जीवनावश्‍यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणार्‍या मालवाहू वाहनांना मिळणार प्रमाणपत्र

जीवनावश्‍यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणार्‍या मालवाहू वाहनांना मिळणार प्रमाणपत्र

 आरटीओच्या इ-मेलवर अर्ज करावे

0
79

गोंदिया दि. 27: कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जग भयभीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात काही देशात मृत्यूचे सत्र सुरू आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीच्या अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.24 मार्च रोजी परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे.

सध्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहनधारकांना परिवहन कार्यालय येणे अडचणीचे होत आहे. परिवहन कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवाव वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सोयीचे व्हावे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या MH35mahatranscom.in ईमेलवर अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्जासोबत संबंधित वाहनांची कागदपत्रे जसे परवाना, कर, योग्यता प्रमाणपत्र,विमा प्रमाणपत्र अनुज्ञप्ती इत्यादी तसेच अर्जदाराचे जीवनावश्यक वस्तूशिवाय इतर वस्तूंची वाहतूक करणार नाही तसेच अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे खरे असल्याबाबत घोषणापत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.अर्जाची शहानिशा झाल्यावरच प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कळविले आहे.