वॉशिंग्टन- जगभरात कोरोनाने 195 देशांना आपल्या विळख्यात घेतले आहे. आतापर्यंत 5 लाख 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत तर 24 हजार 294 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 1 लाख 25 हजार रुग्ण ठीक झाले आहेत.आता या कोरोनाग्रस्तांच्या यादीत आता ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचेही नाव आले आहे. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती आज समोर आली आहे. जॉनसन यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “मागील 24 तासापासून माझ्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती, आज चाचणी केल्यावर याची पुष्टी झाली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे. पण, व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे काम करतच राहील. सोबत मिळून आपण या संकटाशीसामना करू.”





