33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home महाराष्ट्र पदाचा गैरवापर आणि फसवणुक केल्याप्रकरणी भुजबळांवर गुन्हा दाखल

पदाचा गैरवापर आणि फसवणुक केल्याप्रकरणी भुजबळांवर गुन्हा दाखल

0
19

मुंबई, दि. ८ – माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकारी पदाचा गैरवापर आणि फसवणुक केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतल्या कलिना भागातील जमीन अवैधरित्या बिल्डराच्या घशात घातल्याचा आरोप भुजबळांवर आहे. एका याचिकेच्या आधारे न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
भुजबळांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाच अधिका-यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, तत्कालिन कार्यकारी अभियंता हरिष पाटील, बांधकाम विभागाचे अव्वर सचिव संजय सोलंकी, अधीक्षक अभियंता अनिलकुमार गायकवाड, तत्कालीन सचिव एम एच शहा यांचा समावेश आहे

blank