नागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम,३२ शाळांचा १०० टक्के निकाल

0
16

गोंदिया दि. ८: – महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ८९.७३ टक्के लागला आहे.नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचा निकाल अव्वल लागला आहे.तर विभागात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८२.७२ टक्के एवढा सर्वांत कमी लागला आहे.आमगाव येथील वैष्णवी शेंडे हिने ९७.२० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.गोंदिया जिल्ह्यातील ३२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
गोंदिया जिल्ह्यात २३५८६ विद्याथ्र्यांची नोंदणी करण्यात आली होती,त्यापैकी २३ हजार ५३७ परीक्षेला बसले होते.प्रावीण्य श्रेणीत ३३८७,प्रथम श्रेणीत ८५१८,द्वितीय श्रेणीत ७६३१ विद्यार्थी उत्र्तीण झाले आहेत.गोंदिया जिल्ह्यातील २९९ शाळांमध्ये मुलींचे उत्र्तीण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर मुलांचे प्रमाण ८७.४६ टक्के आहे.गोंदिया तालुक्याचा निकाल ८८.५६ टक्के,आमगाव तालुक्याचा निकाल ८६.६२ टक्के,अर्जुनी मोरगाव तालुक्याचा निकाल ८९.८५ टक्के,देवरी तालुकाच्या निकाल ९२.०९ टक्के,गोरेगाव तालुक्याचा निकाल ८७.७३ टक्के,सडक अर्जुनी तालुक्याचा निकाल ९३.६३ टक्के,सालेकसा तालुका ९०.०१ टक्के आणि तिरोडा तालुक्याचा निकाल ९१.८१ टक्के लागला आहे.सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक ९५.६७ टक्के मुलींनी उत्र्तीण होत आघाडी घेतली आहे.तर मुलामध्ये सुुध्दा ९१.५२ टक्के प्रमाण आहे.
नागपूर विभागात दहावीच्या परीक्षेत बंगाली,अर्थीमेटीक(अपंग),qहदी-तमिळ,qहदी-qसधी,आणि फिजिऑलांजी हायजीन विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम भाषा असलेल्या मराठीचा निकाल सुध्दा ८९.१२ टक्ेक लागला आहे.तर प्रथम भाषा उर्दू चा निकाल ९९.०६ टक्के लागला आहे.
जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी -श्रेयस वैद्य (९६.६) विवेक मंदिर गोंदिया, कु.ख्याती पलन (९६.२०) विवेक मंदिर गोंदिया, प्रांजल राऊत (९६.२०) मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी, मोहित मोटघरे (९६) आदर्श विद्यालय आमगाव, कस्तुरी अंजनकर (९५.८०) आदर्श विद्यालय आमगाव, विशाल तुरकर (९५.८०) विवेक मंदिर गोंदिया, प्राची पवार (९५.६०), अपर्णा नागपुरे (९५.२०) जी.एम.बी. इंग्रजी हाय.अर्जुनी मोरगाव, नेहा रामटेक्कर (९५.२०) विवेक मंदिर गोंदिया, मनिष दिघोरे (९५.४०) प्रोग्रेसिव्ह इंग्रजी हायस्कूल गोंदिया, संकेत बनोटे (९५.२०) मनोहरभाई मिल्ट्री हायस्कूल गोंदिया, पीयूष साखरे (९५.२०)गुरुनानक हायस्कूल गोंदिया, तेजस्विनी सोनी (९५) आदर्श हायस्कूल आमगाव, पल्लवी मुरकुटे (९४.६०) आदर्श हायस्कूल आमगाव, आरती कापगते (९४.४०) प्रोग्रेसिव्ह इंग्रजी शाळा गोंदिया, रिना गभणे आणि स्वेता बोरकर (९४.२०) सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव, नितेश लांजेवार (९४)
नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने गतवर्षीचा नावलौकिक मागे टाकत निकालाच्या बाबतीत विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याच्या एकूण निकालाची टक्केवारी ८९.७३ टक्के असून अन्य जिल्ह्यामध्ये नागपूर ८८.९२ टक्के, भंडारा ८७.७२ टक्के, चंद्रपूर ८४.७४ टक्के, वर्धा ८५.९५ टक्के तर गडचिरोली जिल्ह्याचा ८६.२६ असा निकाल लागला आहे. जिल्ह्यात आदर्श विद्यालय आमगावची विद्यार्थिनी वैष्णवी शेंडे हिने ९७.२० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. विवेक मंदिर हायस्कूलचा विद्यार्थी श्रेयष वैद्य याने ९६.६ टक्के गुण घेऊन दुसरा तर याच शाळेतील कु.ख्याती पलन व मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरीचा प्रांजल राऊत यांनी ९६.२० टक्के गुण घेऊन अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
२९९ विद्यालयांमधून ३२ विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यात साकेत पब्लिक स्कूल गोंदिया, विवेक मंदिर हायस्कूल गोंदिया, श्री गणेशन कॉन्व्हेंट गणेशनगर गोंदिया, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल गोंदिया, प्रोग्रेसिव्ह इंग्रजी हायस्कूल गोंदिया, मनोहरभाई पटेल सैनिक स्कूल कुडवा गोंदिया, लक्ष्मीबाई टेंभरे हायस्कूल रायपूर, राजस्थानी इंग्रजी माध्यम हायस्कूल गोंदिया, संस्कार हायस्कूल गोंदिया, चंचलबेन मनीभाई पटेल हायस्कूल गोंदिया, स्वामी तोलाराम आदर्श इंग्रजी हायस्कूल गोंदिया, संत जयरामदास विद्यालय ठाणा, श्री संत गजानन महाराज हायस्कूल घाटटेमनी, राजीव गांधी विद्यालय वल्हाड, स्व.आर.शर्मा हायस्कूल आमगाव, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा इळदा, दिनकर qहदी हायस्कूल दिनकरनगर, जी.एम.बी. हायस्कूल अर्जुनी मोरगाव, न्यू मून इंग्रजी माध्यमिक हायस्कूल अर्जुनी मोरगाव, शासकीय माध्यमिक आश्रमश्राय कडीकसा, शासकीय आश्रमशाळा पांलादूर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पुराडा, नवप्रतिभा हायस्कूल दवडीपार, स्व. ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी, शासकीय आश्रमशाळा शेंडा, नवजीवन विद्यालय राका, स्व. बनारसीलाल अग्रवाल हायस्कूल सडक अर्जुनी, सुषमा आदिवासी आश्रमशाळा सडक अर्जुनी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बिजेपार, ज्ञानदीप आदिवासी आश्रमशाळा विचारपुर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोयलारी व रqवद्रनाथ टैगोर माध्यमिक शाळा ठाणेगाव या शाळांचा समावेश आहे.

आदर्श विद्यालयातील वैष्णवी शेंडे तालुक्यात प्रथम
आमगाव- शालान्त दहावीच्या परीक्षेत आदर्श विद्यालयातील वैष्णवी अशोक शेंडे या विद्यार्थिनीने तालुक्यात ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. आदर्श विद्यालयातील दहा विद्याथ्र्यांनी गुणवत्ता यादीत यश संपादन केला आहे. विद्यालयाचा निकाल ७७ टक्के लागला असून यात वैष्णवी अशोक शेंडे हिने प्रथम तसेच मोहित योगराज मोटघरे ९६ टक्के, कस्तुरी विनायक अंजनकर ९५.८० टक्के, कु. तेजस्विनी उमेश सोनी ९५ टक्के, कु. पल्लवी सुनीलकुमार मुटकुरे ९४.६० टक्के, निलेश प्रभुलाल लांजेवार ९४ टक्के, कुलदीप साईनाथ बोपचे ९३.४० टक्के, कु. निकीता दिनेश शेंडे ९२.२० टक्के, कु. समृद्धी शैलेन्द्रकुमार टेंभुर्णीकर ९१, कु. जश्प्रीतकौर मनजितqसग निर्वाण ९०.२० टक्के गुण मिळवून गुणवंत यादीमध्ये यश संपादन केले आहे.