केंद्रीय दक्षता आयुक्तपदी के.व्ही.चौधरी

0
9

नवी दिल्ली,दि. ८ – प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष के.व्ही. चौधरी आणि माहिती आयुक्त विजय शर्मा यांची सोमवारी अनुक्रमे केंद्रीय दक्षता आयुक्त(सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त(सीआयसी)पदी नियुक्ती करण्यात आली.
यासोबतच भारतीय बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टी.एम. भसिन यांची दक्षता आयुक्त तर माजी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण सचिव सुधीर भार्गव यांची माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या नियुक्तीला संमती दिली. आठवड्याभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या अधिका-यांच्या नावांची शिफारस केली होती.
चौधरी हे भारतीय महसूल सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्य समितीत ते सल्लागार म्हणून काम करत आहेत. गेल्या वर्षी प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळआच्या अध्यक्षपदावरुन ते निवृत्त झाले. तर माजी पर्यावरण सचिव असलेले शर्मा हे २०१२ पासून माहिती आयुक्तपदावर कार्यरत आहेत.