24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home राजकीय आ.चंद्रिकापुरेंनी दिले मुख्यमंत्री निधीत एक महिन्याचे वेतन

आ.चंद्रिकापुरेंनी दिले मुख्यमंत्री निधीत एक महिन्याचे वेतन

0
170

अर्जुनी मोरगाव,दि.22ः गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपला एक महिन्याच्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 ला दिले आहे. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाला आपलाही हातभार लागावा,या उद्देशाने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपले एक महिन्याचे मानधन एक लाख 80 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे.