
गोंदिया दि.१०-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने येत्या ३० जून रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला जिल्ह्यातील आलेल्या पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांच्या आत्मविश्वासावरून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनतेत तीव्र असंतोष असल्याचे दिसून आले.उमेदवारीसाठी आलेल्यांच्या मुलाखती माजी मंत्री अनिल देशमुख, निरीक्षक निलय नाईक,आमदार राजेंद्र जैन यांनी घेतल्या.
यावेळी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांनी संकल्प घेतला असून येत्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सुध्दा पक्षाचा झेंडा रोवण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, माजी आ. दिलीप बन्सोड, विजय राणे, राजलक्ष्मी तुरकर, अशोक गुप्ता, मनोहर चंद्रीकापुरे, रमेश ताराम उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या ५३ जागेसाठी २६३ उमेदवारांनी व पंचायत समितीच्या १०६ जागेसाठी ४५५ उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करून मुलाखती दिल्या. यावेळी निवडक काही मतदारसंघातील नावावर शिक्कामोर्तबही करण्यात आले असून येत्या १० तारखेला संभाव्य पहिली यादी राष्ट्रवादीच्यावतीने जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी बबलू कटरे, अविनाश काशीवार, केवल बघेले, महेश जैन, छबीलाल पटले, नामदेव डोंगरवार, कमल बहेकार, प्रभाकर दोनोडे, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, शिव शर्मा, चुन्नीभाऊ बेंद्रे, प्रेम रहागंडाले, राजू जैन, घनश्याम मस्करे, तुकाराम बोहरे, पंचम बिसेन, रतीराम राणे, गणेश बरडे, सोमेश्वर रहागंडाले, श्रीप्रकाश रहागंडाले, तिर्थराज हरिणखेडे, शैलेष वासनिक, ऊर्मीला रहमतकर आदी उपस्थित होते.





