34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ ओबीसीच्या मुद्यावर सेना आक्रमक

ओबीसीच्या मुद्यावर सेना आक्रमक

0
28

गडचिरोली, दि.१०:- जिल्ह्यातील ओबीसी समाज व शेतकरी यांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी जाहीर केले आहे. सोमवारी देसाईगंज येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला.

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी व देसाईगंज येथील शिवसैनिकांचा मेळावा गजानन मंदिर सभागृहात घेण्यात आला. यावेळी मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून संपर्क प्रमुख किशोर कन्हेरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी आ. रामकृष्ण मडावी, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, अविनाश गेडाम, गोपाल चौधरी, अशोक इंदूरकर, विजय श्रुंगारपवार, छाया कुंभारे, निरांजनी चंदेल, चंदू बेहरे, संतोष मारगोनवार यांनी मार्गदर्शन केले.

दरवर्षीपेक्षा यावर्षी धानाला अत्यंत कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठिण झाले आहे. शासनाने क्विंटलमागे शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात उद्योग नसल्याने युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या जिल्ह्यात उद्योग स्थापन करावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करण्याचीही मागणी शासनाकडे लावून धरली जाईल, असे ठरविण्यात आले. मेळाव्यासाठी अशोक गावतुरे, कवडू सहारे, नसरू भामानी, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, डॉ. महेंद्र मोहबंशी, आशिष काळे, विजय सहारे, नरेंद्र तिरणकर, दशरथ पिलारे, पवन तुपट, संदीप मारगाये, खुशाल दोनाडकर, वासुदेव बट्टे, विठ्ठल ढोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank