23.8 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ उद्योजकांनी ईआर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सादर करावे

उद्योजकांनी ईआर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सादर करावे

0
388

  गोंदिया, दि.24 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयामार्फत गोंदिया जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आस्थापना व खाजगी क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, उद्योजक यांनी मार्च-2020 अखेरचे तिमाही विवरणपत्र ईआर-1 महास्वयंम www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर भरण्यात यावे. तसेच आस्थापना व उद्योजकांनी सदर वेबसाईटवर एम्लायर लॉगीनमध्ये 15 अंकी क्रमांक व पासवर्ड लॉगीन करुन ईआर-1 विवरणपत्र ऑनलाईन सादर करावे. ईआर-1 तिमाही विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असून विवरणपत्र सादर न करणाऱ्या आस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद सेवायोजन कार्यालय कायदा 1959 मधील कलम 7(2) मध्ये करण्यात आलेली आहे. ईआर-1 विवरणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2020 पर्यंत आहे. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गोंदिया यांनी कळविले आहे.