अमरावती,दि.05 : कोविड रूग्णालयात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, परिचा
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी येथील सुपरस्पेशालिटी रूग्णालयात कोविड १९ विशेष रुग्णालय तयार करण्यात आले आहे. रुग्णांची देखभाल आणि उपचार करण्यासाठी या रुग्णालयात सुमारे १०० जणांचे पथक दिवसरात्र कार्यरत असते. डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, तंत्रज्ञ, रुग्णवाहि
तिसरी टीम आपली सेवा देऊन रवाना झाली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वतः उपस्थित राहून या टीमच्या सदस्यांना निरोप दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम व इतर आरोग्य अधिकारी हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी पोलीस बँड वाजवून या पथकाचा सन्मानदेखील करण्यात आला. वाद्यवृंदाच्या तालावर सर्वांनी टाळ्या वाजवून या कोरोना लढवय्यांचे मनोबल वाढविले. अत्यंत जोखमीतही अहोरात्र आपली सेवा बजावणाऱ्या या कोरोना लढवय्यांवर फुलांचा वर्षावही करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री.नवाल यांनी यावेळी सर्व कोरोना लढवय्यांशी संवादही साधला.





