31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हातर्गंत धावणार आज लालपरी

गोंदिया जिल्हातर्गंत धावणार आज लालपरी

0
1409

गोंदिया,दि.06 : ‘लॉकडाऊन’मुळे बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेºयाना आज बुधवारपासून (दि.६) सुरू  करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराला आदेश दिले आहेत. यांतर्गत सुरूवातीला २५ फेऱ्या सुरू केल्या जाणार असून पुढे प्रवासी संख्या बघून त्यात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे महिनाभरानंतर आता परिवहन महामंडळाची लालपरी आज बुधवारपासून पुन्हा जिल्ह्यातर्गंत रस्त्यावर सेवेत येणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान सेवाही बंद करण्यात आली होती. परिणामी ‘लॉकडाऊन’पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद होत्या. मात्र याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने ती डबघाईस आली आहे. ती रूळावर आणण्यासाठी आता शासनाकडून आॅरेंज व ग्रीन झोनमध्ये काही सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यात शिथिलता देण्यात आली असून बस सेवा सुरू करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे.