31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ वेतन भत्ता मिळण्याच्या मागणीला घेवून ११ मे रोजी ग्रामपंचायत कर्मचारी उपाशी राहून...

वेतन भत्ता मिळण्याच्या मागणीला घेवून ११ मे रोजी ग्रामपंचायत कर्मचारी उपाशी राहून करणार काम

0
753

गोंदिया,,दि.06ः- महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक )च्या नेतृत्वाखाली आपल्या थकीत वेतन व भत्ता मिळण्याच्या मागणीला घेवून गोंदिया जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचारी ११ मे सोमवारला उपाशी पोटी ग्राम पंचायतीची कामे करणार असल्याची माहिती राज्य महासंघाचे संघटन सचिव का. मिलिंद गनविर यांनी  दिली आहे.जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्राम पंचायत कर्मचा-यांना जानेवारी पासुन अद्यापही ग्राम पंचायतीने वेतन भत्ता दिलाच नाही. यापूर्वीचे पण अनेक कर्मचा-यांचा वेतन भत्ता थकीत आहे. या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी व उपमुका.अधिकार्यांना अनेकदा निवेदने दिली.पण याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यांने कर्मचा-यांवर उपासमारीची पाळी आली आहे. गाव पातळीवर कोरोणा (कोविड-19) महामारीच्या निर्मुलन करण्याच्या मोहिमेत अल्पशा पगारावर जिवण जगणारा हा कर्मचारी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाळत आहे.या मोहिमेत दिवस रात्र कामे करणा-यां या कर्मचा-यांचे वेतन भत्ते थकीत ठेवून त्यांचेकडून उपासी पोटी अधिकारी वर्ग काम करुन आपले कोणते राष्ट्रीय कर्तव्य पार पाळत आहे ? अशा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. कर्मचा-यांचे वेतन,भत्ते व ईतर सेवाशर्तीची ग्राम पंचायती कडून अमलबजावणी करवूनण घेण्याची जबाबदारी ग्राम विकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुका.अधि तसेच गट विकास अधिका-यांना क्रमबद्ध रित्या दिलेली आहे.सेवाशर्तीचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्याचे अधिकार पण यांना दिलेले आहेत.सनाने दिलेल्या या दोन्ही जबाबदारीचे पालन करण्यात हे अधिकारी असमर्थ ठरलेले आहेत. या बाबत महासंघाने यांना अनेकदा निवेदने दिली,पण यांचे कडून काहीच कार्यवाही न होणे खेदाची बाब आहे .अधिकारी वर्गाच्या अशा धोरणा मुळे ग्राम पंचायत करमचा-यांत असंतोष पसरत आहे व अधिकारी वर्ग कोरोणा महामारी च्या निर्मुलनाच्या कामावर असलेल्या या करमचा-यांचे “कोरोणा “च्या नावावर करमचा-यांचे शोषण करत असल्याचा आरोप मिलिंद गनविर यांनी केला आहे व अशा अधिका-याचां जाहिर निषेध म्हणूण दि. ८ में रोजी उपासी पोटी राहूण ग्राम पंचायतीची कामे करणार आहे या काळात उद्भभवलेल्या परिस्थितीची संपुर्ण जबाबदारी संबधित अधिकारी वर्गावर राहणार अशी सुचना राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ,प्रधान सचिव,जिल्हा अधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे.