
गोंदिया,दि.06ः राज्यात दारु विक्रीला परवानगी मिळाली असली तरी अद्यापही पुर्व विदर्भातील जिल्ह्यात दारु विक्रीला परवानगी एकाही जिल्हाधिकार्यांनी अद्याप दिलेली नाही.त्यातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परवानगी दिल्यावर पहिल्याच दिवशी खरेदीसाठी ग्राहकांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे फिजिकल डिस्टसिंग(सोशल डिस्टसिंग) कुठेल पाळले नसल्याचे चित्र बघावयास मिळाले.असाच प्रकार भविष्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून ग्राहकांना टोकन देऊन टप्प्याटप्प्याने मद्यविक्री करावी, अशा सूचना उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.मार्चच्या दुसर्या आठवड्यापासून टाळेबंदी लागू झाल्यावर संपूर्ण राज्यात मद्यविक्री बंद करण्यात आली होती. 3 मे पासून केंद्राने दिलेल्या आदेशाच्या आधारे राज्य सरकारने अंशतः मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार राज्यात, काही शहरात मद्यविक्रीला सुुरवात झाली. पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी झाली. काही ठिकाणी लाठीमार झाला.मुंबई,नाशिकमध्ये गर्दी वाढल्याने परवानगी रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क खात्याने गर्दी टाळण्यासाठी काही उपाययोजना करण्यास उत्पादन शुल्क खात्याच्या अधीक्षकांना दिल्या. त्यानुसार दुकानापुढे सहा फुटाच्या अंतरावर मार्किंग करावे, ग्राहकांना चिठ्ठ्या किंवा टोकन देऊन त्यांना कोणत्या कंपनीचे किती मद्य हवे याची त्याच्या नाव व मोेबाईल क्रमांकासह नोंदणी करावी व पहिल्या एक तासात किमान पन्नास याप्रमाणे आठ तासात किमान 400 लोकांना मद्यविक्री करावी. 400 पेक्षा अधिक ग्राहक असेल तर दुसर्या दिवशी त्यांना टोकन क्रमांकानुसार मद्य द्यावे, असेही यावेळी सांगण्यात आले.





