25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Featured News सुर्तीसेन वैद्य गुरूजी यांचे मरणोत्तर देहदान

सुर्तीसेन वैद्य गुरूजी यांचे मरणोत्तर देहदान

0
205

गोंदिया,दि.06ःफुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेचे सामाजिक कार्यकर्ते नागार्जुन बुध्द विहाराचे संस्थापक आणि महाराष्ट्र पुरोगामी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक,बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण प्राप्त  सुर्तीसेन वैद्य गुरुजी यांचे आज(दि.6) निधन झाले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कुटुबियांना सोपविला.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दान करावे, तसेच तथागत गौतम बुद्ध म्हणतात, “आर्थिक दान, भोजन दान ज्यांच्या मुळे लोकांचा फायदा होईल ते काम नेहमी करत राहावे” त्यानुसार सुर्तीसेन वैद्य गुरूजी यांचा देहदान परिवारांकडुन करण्यात आले.त्यांच्या मागे त्यांचे पुत्र संजय, धनंजय आणि मनंजय, सुना, नातवंडे भाऊ यशवंत असा मोठा परिवार आहे.