23.5 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Featured News श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने मजुरासांना निःशुल्क भोजन सेवा

श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने मजुरासांना निःशुल्क भोजन सेवा

0
213
photo by-satish pardhi gondia

गोंदिया,दि.07- गोंदिया संपूर्ण जगात केरोना सारखा जीवघेण्या साथीच्या रोगाने दहशत पसरली असून संपूर्ण मानव जातीचा कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकावर एक अशी महत्वपूर्ण पावले उचलत आहेत सरकारने कोरोना संक्रमण विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केलेले आहे. अशावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गेलेला कामगार वर्ग शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी तसेच औषध उपचारासाठी गेलेले एक ना अनेक लोक त्या त्या ठिकाणी अडकून पडलेल्या अवस्थेत आहेत.

‘गड्या आपला गाव बरा‘ या हेतूने छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार, महाराष्ट्र आंध्रप्रदेश, हैद्राबाद, रायपुर ,बिलासपूर येथून मोठ्या प्रमाणात मजुरांचे जथ्थे पायी-पायी ४०० ते ५०० किलोमीटरचा प्रवास उपाशी तापाशी करतात बस, टड्ढेन बंद असल्यामुळे रेल्वे मार्गाने पायीपायी आपल्या गावाकडे हे जात असतात दररोज पोटात अन्न नाही, कडेवर लहान मुले त्यातही सामानाचे ओझे अशाप्रकारे बसत उठत, पाणी पीत ते गावाकडे जात असतात. अशा प्रवाशांचे होणारे हाल श्री गणेश ग्रामीण शिक्षण संस्थेचे विजय बहेकार यांनी बघून या संकटकालीन परिस्थितीत अशा मजुरांना पोटभर अन्न मिळावे यासाठी त्यांनी संस्थेच्या वतीने आपल्या कार्यालय असलेल्या रेल्वे क्रॉसिंग जवळ निशुल्क आपात्कालीन भोजन सेवा केंद्राची सुरुवात केली. विशेष उल्लेखनीय बाब हि की दिनांक २७ मार्च पासून त्यांनी या आपत्कालीन भोजनालय ची सुरुवात केली आहे. कामगार मजूर वर्गांना त्या अनुषंगाने दररोज पायी ये-जा करणाèया मजुरांना पोळी, भात, भाजी, वरण, चटणी अशा प्रकारचे रुचकर अनलिमिटेड पोटभर जेवण त्यांना दररोज खायला दिले जाते.

सदर खानावळ रोज सकाळी आठ वाजेपासून तर रात्री एक वाजेपर्यंत सुरू असते दररोज या सुमारास ६०० ते ७०० मजुरांना जेवण दिले जात आहे. तसेच या मजुरांना जेवणाआधी रिसीव करून सॅनेटाईझ केले जाते तद्नंतर हॅडवाश केल्यानंतर त्यांना बसून आरामशीर पोटभर अन्न दिले जाते. जेवणाबरोबरच त्यांना फळ, फु्रट आधी खायला दिले जाते. तसेच त्यांच्या लहान मुलांसाठी बिस्किट, फळ, फु्रट,ग्लुकोज, मास्क दिले जाते. गावी जात असतांना त्यांना कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये म्हणून फळ फु्रट बिस्किट गुलकोज तसेच मास्क ही दिले जाते. याचबरोबर गोंदिया शहरातील कुठल्याही दवाखान्यांमध्ये असलेल्या रूग्णसाठी टिफिनचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय उपक्रमाची माहिती होताच गोंदिया शहरातील तसेच बाहेरील व्यक्तीकडून त्यांना साहित्याच्या रूपात किंवा पैशाच्या रूपात गोंदिया शहरातील काही समाजसेवी संस्था अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नाबार्डचे अधिकारी गुरुद्वारा सेवा समिती, खालसा सेवा दल तसेच अनेक सरकारी कर्मचारी, नागरिक हे या कार्यात त्यांना मदत करीत आहेत.

blank