गोंदिया,दि.19ः भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोदिया जिल्हा कौंसील तर्फे आज दि.१९ मे रोजी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या आवाहनावर प्रवासी मजुरांना,कामगारांना आपल्या गावी व घरी जायला शासनाकडून मोफत व्यवस्था व्हावी याकरीता निदर्शने करण्यात आली.मजुरासांठी रेल्वे व बसची ताबडतोब व्यवस्था करणे, गावों -गावी आलेल्या मजुरांना मनरेगा अंतर्गत गरजेनुसार काम व ४००रू.दैनिक मजुरी देने,प्रवाशी मजुरांना १० हजार रू.प्रवास भत्ता देने,नगर व महानगरात रोजगार निवा-याची हमी देने, सर्वांनाच गरजे प्रमाणे सरकारी रेशन देने,वृद्ध,विधवा,परित्यक्ता व अपगांना पेंशन व सामाजिक सुरक्षा देने व ईतर मागण्यांणा घेवून स्थानिक पाल चौका वर पार्टी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली व पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांचे नांवे एसडीओ गोंदिया यांना मागण्यांचे निवेदन प्रस्तुत केले या निदर्शनात प्रामुख्याने का .शिवकुमार गणविर (राज्य सचिव मंडल सदस्य), रामचंद्र पाटील,सि.के. ठाकरे, प्रह्लाद उके.परेश दुरूगवार, बि.एस. नेवारे ,का. छन्नु रामटेके साजिद कुरैशी,सुरेश रंगारी,सुबोध बागडे, तथा का.मिलिंद गनविर एवंम का.करूणा गनविर इत्यादी कार्यकर्ते शामिल झाले





