24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Featured News विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

0
239

भंडारा,दि.20ः वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या व कोका वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या चितापूर गाव परिसरात शेतातील विहिरीत एक बिबट पडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांच्यामार्गदर्शनात बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून बिबट्याला सुखरुप बाहेर काढले.
विहिरीत बिबट पडल्याची माहिती शेतमालक प्रकाश कुसराम यांनी भंडारा वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाचे आरआरयुचे पथक सकाळी ११ वाजताच्या सुमारास चितापूर येथे दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर बिबट्याला गडेगाव येथील आगारात आल्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. बिबट शारिरीकदृष्ट्या ठिक असल्याने त्याला संध्याकाळी कोका अभयारण्यात सोडण्यात आले.
ही कारवाई उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांच्या मार्गदर्शनात आरआरयु पथकाचे अनिल शेळके, निलेश श्रीरामे, नवनाथ नागरगोजे, कुळसंगे, भरडे यांनी केली. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कारधा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम लांबाडे व कर्मचारी उपस्थित होते.