गोंदिया,दि.२५ः-गेल्या दीड महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन असून करोना संसर्गाचा रोखथाम करण्यासाठी शासनपातळीवर जोरदार प्रयत्न चालविले जात आहेत.त्या अनुषंगानेच आज सोमवारला राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी झुम अॅपच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुखांशी सविस्तर चर्चा करीत जिल्ह्यातील विविध समस्यांची माहिती जाणून घेतली.गोंदिया जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे हे सुध्दा आज झालेल्या या झुम अॅपच्या व्हिडीओकॉन्परंसमध्ये सहभागी झाले होते.शिवहरे यांनी मुख्यमंत्र्यांना गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येची माहिती देत गावपातळीवर करण्यात आलेले क्वारटांईन आणि वैद्यकीय क्षेत्रातील सुविंधावर माहिती दिली.सोबतच जिल्ह्यातील अनेक मुद्यांवर चर्चा करीत काही गंभीर मुद्दे मुख्यमंत्र्यांकडे मांडत निष्पक्षपणे चौकशी करुन आपल्या सरकारच्या कार्यकाळात सामान्य जनतेला न्याय मिळेल यासाठी कठोर भूमिका जिल्हापातळीवरील निष्क्रिय अधिकारीवर्गाबाबत करण्याची माहिती त्यांनी चर्चेदरम्यान दिली असून मुख्यमंत्र्यांनी शिवहरे यांनी दिलेल्या माहितीबद्दल समाधानव्यक्त करीत जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी दिलेल्या मुद्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.





