31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ क्वारंटाईन नागरिकांनी केला जि.प.प्राथ.शाळेचा कायापालट

क्वारंटाईन नागरिकांनी केला जि.प.प्राथ.शाळेचा कायापालट

0
893

अर्जुनी मोर(संतोष रोकडे),दि.२९: करोनाच्या दहशतीमध्ये सापडलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात बाहेर राज्यात मजुरी साठी गेलेल्या नागरीकावर ग्रामपंचायत व करोना दक्षता समितीने नजर ठेवत त्यांना घरी न जाऊ देता गावातील शाळेतच क्वारंटाईन करीत आहे. अशातच तालुक्यातील कुंभिटोला ( बाराभाटी )येथे बाहेरुन आलेल्या तिन महिलांसह 14 लोकांना जि.प.प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले.14 दिवसाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून त्या सर्व लोकांनी शाळेचा कायापालट करण्याचे दृष्टीने शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन शाळेचा कायापालट केला आहेत.
करोना व्हायरसने अर्जुनी मोर.तालुक्यात 31 रुग्ण पाझेटिव्ह आढळून आल्याने तालुका हाॅटपास्ट ठरला आहे. तालुक्यातील गावंगाव अलर्ट झाले आहेत.बाहेर राज्यातुन मोठ्या संख्येने मजुर वर्ग परत येत असल्याने गावातील लोकांनीच सुरक्षेचा विडा उचलला आहे.प्रत्येक गावात करोना दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे.समितीचे कार्यकर्ते गावात फिरुन मास्क लावा, गर्दी करु नका, विनाकारण फिरु नका असा संदेश देत आहेत.बाहेरुन गावात येणा-या नागरीकांना लगेच 14 दिवसासाठी गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. गावकरी यांच्या या मोहिमेला बाहेरुन येणारी मंडळी सुध्दा प्रतीसाद देत असुन स्वमर्जीने क्वारंटाईन होतात.अशातच कुंभिटोला येथील 14 लोक जि.प.प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. त्यांनी मात्र शाळेची साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे. गावची शाळा आमची शाळा या म्हणीप्रमाणे त्यांनी शाळेचा कायापालट केल्याची माहीती कुंभिटोला येथील माजी सरपंच व शेतीनिष्ठ शेतकरी देवेंद्र राऊत यांनी दिली.