37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा ३ रुग्णांची भर; एकूण रुग्णसंख्या ३१

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा ३ रुग्णांची भर; एकूण रुग्णसंख्या ३१

0
538

blank

गडचिरोली,दि.२९: आज सकाळी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात ३ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. नव्या रुग्णांमध्ये दोन रुग्ण मुलचेरा, तर एक रुग्ण अहेरी तालुक्यातील असून, आता एकूण रुग्णसंख्या ३१ झाली आहे.नव्याने पॉझिटीव्ह आढळलेले तिन्ही रुग्ण मुंबई येथून आलेले असून, त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. त्यातील पहिले पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले. त्यामुळे आता विलगीकरणात असलेल्या एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २६ असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

blank