30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ कंटेंटमेंट झोन अरततोंडी, सिलेझरी येथे गाव समितीची सभा

कंटेंटमेंट झोन अरततोंडी, सिलेझरी येथे गाव समितीची सभा

0
533

अर्जुनी मोरगाव,दि.04 : तालुक्यातील अरततोंडी दाभना व सिलेझरी येथील एक-एक मुळनिवासी कोरोना बाधित आढळल्यामुळे २९ मेला अरततोंडी व सिलेझरी हे गाव कंटेंटमेंट झोन म्हणून तालुका प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. दरम्यान कंटेंटमेंट झाने असलेल्या अरततोंडी/ दाभना व सिलेझरी या दोन्ही गावी १ जूनला गाव समितीची सभा घेण्यात आली.
या सभेला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार विनोद मेश्राम, गटविकास अधिकारी मयुर अंदेलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत, तालुका कृषी अधिकारी लांजेवार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, संचालक गोंदिया जिल्हा सहकारी बँक समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी सिलेझरी व अरततोंडी या दोन्ही गावी वेगवेगळ्या झालेल्या सभेत उपस्थित अधिकार्‍यांनी गावकर्‍यांना कोरोना बाबत खबरदारी घेण्याचे व कंटेंटमेंट झोनमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी खबरदारी घेवून शासनाच्या मार्गदर्शक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.