32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ बीडीओंविरोधात पं.स. अधिकारी, कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

बीडीओंविरोधात पं.स. अधिकारी, कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

0
489

सिरोंचा,दि.17ः स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने एल्गार पुकारला आहे. महासंघाच्या सिरोंचा तालुका शाखेच्या नेतृत्वाखाली स्थानिक पंचायत समितीत कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांनी १६ जून पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
आंदोलनाकर्त्यांं अधिकारी, कर्मचार्‍यांनी यासंदर्भात सिरोंचा येथील तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे हे मनमानी पद्धतीने पंचायत समितीचा कामकाज चालवत आहेत. अधिकारी-कर्मचार्‍यांशी उद्धटपणे वागतात, शिवीगाळ व अरेरावी करतात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या विरोधात आक्रमण भूमिका घेत उंदिरवाडे यांच्यावर कारवाई करावी, यासाठी १५ जूनला जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महासंघातर्फे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर आजपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शारीरिक इंतर पाळून आणि कोरोनाची सर्व कामे करून हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
या आंदोलनात पी. आर. कोपनार, एस. जे. निमसकरार, ए. के. बंडावार, डी.डी. पोरटे, एल. एस. कुमरे, डी.जे. पारधी यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झालले आहेत. गटविकास अधिकारी उंदिरवाडे यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे उंदिरवाडे हे यापूर्वी गडचिरोली पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी कार्यरत होते, येथेही त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.