25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Featured News महाराष्ट्र व मध्यप्रदेशात ५० ‘सारस’ पक्ष्यांचे वास्तव्य

महाराष्ट्र व मध्यप्रदेशात ५० ‘सारस’ पक्ष्यांचे वास्तव्य

चंद्रपूरातून नामशेष होण्याचा मार्गावर तर भंडारा जिल्ह्यात 2 सारस

0
318
गोंदिया,दि.20ः-   गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सारस गणनेव्दारे महाराष्ट्रात अंदाजे ५० तर मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातही ५० सारस पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ही गणना १३ ते १८ जून दरम्यान पार पडली. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातून सारस पक्षी जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचला असून 1 नर सारस जिल्हात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सारस पक्ष्यांच्या संख्येत नाममात्र  वाढ झाल्याने  त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलणे गरजेचे आहे.  महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 20ते 23 गटाने 7- ते 80 ठिकाणी स्वंयसेवकांच्या मदतीने ही गणना पार पडली.गणनेअंती महाराष्ट्रात ४७ ते ५० सारस पक्ष्यांचे वास्तव्य असून मध्यपद्रेशातील बालाघाट जिल्ह्यात ५६ ते ५८ सारस पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे.blank

महाराष्ट्रातील केवळ गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या संख्येने सारस या पक्ष्याचे अस्तित्व टिकून राहिले आहे. सारस क्रौंच हा मुख्यत्वे भातशेतीत किंवा छोटय़ा तलावात (याला बोडी म्हणतात) घरटे तयार करतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या पक्ष्यांच्या अस्तित्वाला अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा वापर आणि मानवी हस्तक्षेपाचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात वाघ-बिबट्यांप्रमाणे सारस पक्ष्यांचीही दरवर्षी गणना होते. ‘सेवा’ (Sustaining Environment and Wildlife Assemblage) ही संस्था २००४ पासून दरवर्षी या पक्ष्यांची गणना करीत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी दिली.

२००४ साली राज्यात केवळ चार ते सहा सारस पक्ष्यांचे वास्तव्य होते. यंदा गोंदियात ४५ ते ४७, भंडाऱ्यात २ आणि चंद्रपूर जिल्ह्यात केवल १ सारस पक्षी, असे एकूण अंदाजे ५० पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती.. यामधील चंद्रपूर जिल्ह्यात केवळ १ नर सारस पक्षी आढळला असून त्याला प्रजननासाठी मादी न मिळाल्यास या प्रदेशातून सारस पक्षी नामशेष होईल, अशी भीती बाहेकर यांनी वर्तवली आहे. गेल्यावर्षीच्या नोंदीत राज्यात ४१ ते ४२ सारस पक्ष्यांचे वास्तव्य होते. यंदाच्या गणनेमधूनही गोंदिया जिल्ह्यामध्येच मोठ्या संख्येने या पक्ष्यांचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. अभियानात गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज,दक्षिण वनमंडळ बालाघाटचे  अनुराग कुमार,वनपरिक्षेत्र अधिकारी हट्टा धर्मेंद्र शर्मा, वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया सुशिल नादवटे, वनपरिक्षेत्र अधिकारी आमगांव पी.बी.चन्ने, वनपरिक्षेत्र अधिकारी तिरोडा शेषराव आकरे, गोंदिया ज़िल्हा पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे व समस्त वनकर्मचार्यांचे सहकार्य लाभले.या गणनेत सेवा संस्थेचे भरत जसानी, चेतन जसानी, अंकित ठाकुर, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे, दुस्यंत आकरे, संजय आकरे,  अशोक पडोळे, दुश्यंत रेभे,अश्विनीकुमार पटले, पिंटु वंजारी, रूचीर देशमुख, मुकुंद धुर्वे,  बबलु चुटे,  बंटी शर्मा, रिशील डाहाके, सौरभ घरडे, सलिम शेख, दिपक मुंदडा, राकेश डोये,  दानवीर मस्करे,  कमलेश कांमडे,  जैपाल ठाकुर, जलाराम बुधेवार, प्रशांत मेंडे,प्रविण मेंढे,विकास फरकुंडे, डॉ. तांडेकर,  मनिष कुर्वे, डिलेश कुसराम, लोकेश भोयर,संदिप तुरकर, पप्पु बिसेन,शेरबहादुर कटरे, बसंत बोपचे,  धर्मेद्र बिसेन,राहुल भावे, रतिराम क्षीरसागर,  ललित भांडारकर, रवि पालेवार,अभय कोचर   निशांत देशमुख,सिंकदर मिश्रा,गौरव मटाले,नखाते, कार्तिक चौहान,शेखर फुडे, विशाल कटरे,जितु हरिनखेड़े,मुकेश बिसेन,तपेश कटरे,चंदन राहंगडाले,राकेश टेंभुर्णीकर,पराग जीवानी,अमित बेलेकर, . अतुल ढबाले,TRACT संस्था व भंडारा जिल्ह्यातील  SEAT संस्थेचे शाहिद खान,राजकमल जोब असे 205 सदस्य सहभागी झाले होते.