31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ खळबंदा जलाशयात मासोळ्यांचा मृत्यू

खळबंदा जलाशयात मासोळ्यांचा मृत्यू

0
182

गोंदिया दि.२1:: तालुक्यातील खळबंदा जलाशयात (दि.२०) मोठ्या प्रमाणात मासोळ्यात मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार घडला. या मासोळ्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला. हे कळले नसून या तलावात मासेमारी करणार्‍या बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मागील २ वर्षांपासून या जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात येते. यामुळे या परिसरातील सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. अशातच या तलावात मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय होत असतो. या तलावात पाणी तसे शुध्दच राहते. पहिल्यांदाच या जलाशयात आज, मासे मृत्यूू पडत असल्याचा प्रकार घडला. पाण्यात बदल झाल्याने किंवा उष्णतेमुळे हे मासे मरण पावले हे कळू शकले नसले तरी हा प्रकार धोकादायक असून व्यवसायाला आर्थिक संकटात टाकणारा आहे. आज जवळपास २० क्विंटल मासे मरण पावले. यामुळे मत्स्य व्यवसायिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी पप्पु अटरे, गुड्डू लिल्हारे, अजाबराव रिनायत आदिंनी केली आहे.