गोंदिया,दि.२२: लद्दाखच्या सिमेवर भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गोंदिया येथील आम आदमी पार्टीच्या वतीने जनआक्रोश प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान चीन च्या सरकारचा निषेध नोंदवून चिनी वस्तुंचा बहिष्कार घालण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
लद्दाखच्या सिमेवर मागील महिनाभरापासून चीन या देशाकडून कुरापती सुरू आहेत. दरम्यान भारतीय सैन्याचे जवान चर्चेसाठी गेले असताना अचानक चीनी जवानांनी भारतीय जवानांना लक्ष करून हल्ला केला. यात भारताचे २० जवान शहीद झाले असून या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले आहेत. चीनच्या या भ्याड कृत्यामुळे जनमानसात आक्रोश असून चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तुंवर बहिष्कार घालणे सुरू झाले आहे. चीनच्या भ्याड कृत्याचा निषेध म्हणून आम आदमी पक्षाच्या वतीने जन आक्रोश प्रदर्शन करून चीनच्या सरकारचे निषेध करण्यात आला आहे. तसेच भारताच्या शहिद जवानांन श्रध्दांजली वाहून चीनी वस्तुंचा बहिष्कार करावा, असे आवाहन गोंदिया शहरातील नागरिकांना करण्यात आले.
यावेळी उमेश दमाहे, नागपुर विभागीय कोषाध्यक्ष पुरषोत्तम मोदी, अरुण बन्नाटे, जय सलामे, जिल्हाध्यक्ष मिलन चौधरी, सचिव कन्हैया राजपूत, सोशल मीडिया प्रभारी अक्षय वानखेड़े, कोषाध्यक्ष कपिल अग्रवाल, अभय पटले, सचिव नरेंद्र गजभिये, विठोबा भाजीपाले आदि उपस्थित होते.





