
गोंदिया,दि.०१::भारतीय कम्युनिस्ट पक्ष गोंदिया जिल्हा कौंसिल नें राज्याचे उर्जामंत्ञांच्या केलेल्या त्या घोषणे चा निषेध केला. ज्यात मंत्री महोदयांनी “३महिन्याचे एकमुश्त विज बिल भरणा केल्यावर विज ग्राहकांना २टक्के सुट देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे ” या घोषणेला पक्षाने विज ग्राहकांची करण्यात येत असलेली फसवणुक म्हटले आहे. या प्रश्नावर ३ जुलै ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विद्युत बिलाची होळी जाळून निषेध आंदोलन करण्याचे आवाहन पक्षाच्या गोंदिया जिल्हा कौंसिल चे सचिव का.मिलिंद गनविर यांनी केले आहे.महाराष्ट्र सरकार कोरोना (कोविड-19)च्या कारणाने लाकडाउन काळात उत्पन्न परिस्थितीत त्रस्त जनतेची हलाकीची आर्थिक स्थितीकड़े दुर्लक्ष करत आहे, काम धंदे बंद आहेत,लोकं बेकारी च्या अवस्थेत आहेत व अशा प्रतिकूल परिस्थितित सवत:व आपल्या कुटुंबीयांचा भरण पोषण करणे आव्हान आहे .अशावेळी अवास्तव विज बिल पाठवुण या माध्यमातून सरकार चे वसुली अभियान घोर निंदनीय आहे ऐकी कड़े केरळ ,दिल्ली ई. सरकार ५० टक्के विज बिल माफ करूण जनतेला दिलासा देण्याचे प्रयत्न करत आहेत तर महाराष्ट्र सरकार २ टक्के विज माफ करण्याची घोषणा करून या वेळी वसुलीची संधीच साधत आहे . मिलिंद गनविर यांनी ३ जुलै ला विज देयकांचे दहन आंदोलनाला सहकार्य करण्याची विनंती विद्युत ग्राहकांना केली आहे.




