
गोरेगाव,दि.6: – तालुका भाजपच्या वतीने जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुका भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी तडफदार, मन मिळावू व्यक्तिमत्त्व असलेले विनोद पटले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद पटले हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणुन कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत भाजप निवड समितीने त्यांना युवा मोर्चाचे अध्यक्षपद बहाल केले. त्यांनी मागील काही वर्षांपासून पक्ष कार्यात स्वतःला झोकून दिले होते. त्याच्याच कामाची पावती त्यांना युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.





