38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय मंत्री ॲड. यशोमती ठाकूर बुधवारी जिल्ह्यात

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर बुधवारी जिल्ह्यात

0
220
????????????????????????????????????

blank

वाशिम, दि. ०7 (जिमाका) : महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ह्या बुधवार, ८ जुलै २०२० रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंत्री ॲड. श्रीमती ठाकूर ह्या ८ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. अमरावती येथून वाशिमकडे प्रयाण करतील. सकाळी ११.१५ वा. त्यांचे वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. सकाळी ११.२० वा. वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा व आढावा.

दुपारी १.३० वा. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समवेत कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत चर्चा व आढावा. दुपारी २ ते ३ वा. शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी ३.०५ वा. वाशिम जिल्हा परिषदेकडे प्रयाण करतील. दुपारी ३.१० वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित बैठकीत महिला व बालविकास (राज्य/जिल्हा परिषद व नागरी) तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा त्या आढावा घेतील. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता वाशिम येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण करतील.

blank