38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरेंशी संवाद

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरेंशी संवाद

0
277

blank

गोंदिया,दि.20ः– राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि मंत्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रविवारी(दि.19) संवाद साधला़. त्यात कोरोनाची स्थिती आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़.तसेच गोंदिया जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासबंधीची माहिती मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी दिली़ जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न यानिमित्ताने मांडता आले, असेही शिवहरे म्हणाले़.शिवहरे यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोना संदर्भात सर्वप्रथम माहिती दिली़ कोरोनाने शहरातून ग्रामीण भागाकडे लक्षवेधी शिरकाव केला आहे़. कोरोनाचा मृत्यूदर आणि बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी देखील लक्षात आणून दिली़.त्यातच क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांना निकृष्ठ जेवण दिले जात असून अव्यवस्था असल्याचे निदर्शनास आणून दिले.एका महिन्यात चार जिल्हा शल्यचिकित्सक बदलले असून विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सकही आजारी राहत असल्याने आरोग्य सेवा विस्कळित झाल्याचे तसेच वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाताचेही दुर्लक्ष असल्याची माहिती दिली. खरिपाच्या हंगामात पेरणी व रोवणीची कामे जिल्ह्यात सुरु असून बोगस बियाणांचा मोठा व्यापार सुरु असल्याने शेतकरी बांधवांची फसवणूक होत असल्याचे सांगत गोदामात खताचा साठा असताना दुकानात खतांची टचांई निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. त्यात प्रामुख्याने युरिया या रासायनिक खतांचा मोठा काळाबाजार होत असल्याच्या शेतकरी बांधवांच्या तक्रारी वाढल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या लक्षात आणून दिले.युरियाचा प्रश्न सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या प्रश्नावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषिमंत्री दादा भुसे यांना याबाबत बोलण्यास सांगितले़ त्यावर कृषिमंत्र्यांनी युरियाचा प्रश्न लवकरात लवकर तीन ते चार दिवसात निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यात वनविभागात मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु असल्याचे तसेच जंगलातील अवैध कटाईसह इतर प्रश्नावर वनमंत्री संजय राठोड यांचे लक्ष वेधले.जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीच्या रिक्तपदाबाबतही गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना माहिती देत जिल्ह्यात अवैध व्यवसाय वाढत असल्याने गुंडगिरी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले़.पक्षभेद विसरुन कोरोना दक्षता समित्या स्थापन कराव्यात़ सुरक्षित राहून इतरांची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले़.

blank