37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय पार्थ हा विषय छोटा-पवार कुटुंबाबद्दल चुकीच्या चर्चा-खा.पटेल

पार्थ हा विषय छोटा-पवार कुटुंबाबद्दल चुकीच्या चर्चा-खा.पटेल

0
269

blank

नागपूर,दि.16ः – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्याने प्रसारमाध्यमांसह पवार कुटुबियांत चर्चेचे गुर्हाळ सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हा अतिशय छोटा विषय असल्याचे म्हटले. तसेच, काका विरुद्ध पुतण्या या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसून प्रसारमाध्यमांनी रंगवलेल्या गोष्टी असल्याचे नागपूरात पत्रकारांशी सवांद साधताना म्हणाले. प्रिंट आणि टेलिव्हीजन मीडियात गेल्या 3 ते 4 दिवसांत जे पाहतोय, त्यात अजिबात काहीच नाही. पार्थ पवार गुरुवारी सुप्रियाताई आणि शरद पवार यांना घरी जाऊन भेटूनही आले आहेत. हा विषय अतिशय छोटा असून मोठा राजकीय विषय बनल्याचे मला वाटत नाही. तसेच मी जबाबदारीने सांगतो की, अजित पवार vs शरद पवार ही फालतू चर्चा सुरू असून त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही,प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट सांगितले.शरद पवार त्यांच्या जागेवर योग्य असून पार्थ पवारही त्यांच्या जागेवर योग्य असल्याचे कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पवार कुटुंबात वाद असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळला आहे. पवार कुटुंबात एकोपाच असतो. माध्यमांनी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.”

blank